आमगांव व गडचिरोलीतील विकासकामांना गती; ; मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन

प्रमुख मागण्याचे निवेदन
- रावणवाडी–कामठा–आमगांव–सालेकसा–दर्रेकसा–पनियाजोब–डोंगरगाव–तुमडी बोर्ड (छत्तीसगड) या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा.
- देवरी–आमगांव राष्ट्रीय महामार्गावरील बामणी व किडगींपार येथील रेल्वे क्रॉसिंगवर मंजूर उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करावे.
- आमगांव नगरपरिषद व उद्वीर सात गाव ग्रामपंचायतींशी संबंधित प्रलंबित प्रशासकीय प्रश्न मार्गी लावावेत.
- धानोरा–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करावे.
- गडचिरोली–आरमोरी फोरलाईन मंजूर झाल्याबद्दल अभिनंदन करून या कामाला गती देण्याची मागणी.
मुख्यमंत्री व मंत्र्यांची आश्वासनात्मक भूमिका
या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहानुभूतीपूर्वक चर्चा करत “विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील” असे आश्वासन दिले. त्यामुळे या भागातील रस्ते, पूल व प्रशासकीय प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे.
उपस्थित मान्यवर
या शिष्टमंडळात माजी आमदार भैरसिंग नागपूरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, ज्येष्ठ नेते झामसिंग येरणे, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, जिल्हा महामंत्री अनिल येरणे, जिल्हा सचिव देवेंद्र मच्छीरके, राजेश शिवणकर, कैलास तिवारी, धनलाल मेंढे, संतोष श्रीखंडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अशोक नेते यांची प्रतिक्रिया
डॉ. नेते म्हणाले,
“आमगांव-देवरी मतदारसंघ व गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गतीमान करणे हेच आमचे ध्येय आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने रस्ते, पूल व प्रशासकीय प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


