शिवसेना ही सामान्य माणसाच्या हक्काची आणि न्यायाची लढाई लढणारी संघटना : माजी आ.कोरोटे
देवरी :- देवरी येथील कोरोटे भवन,येथे तालुका महिला शिवसेना (शिंदे गट )समितीच्या वतीने दिमाखात दिवाळी मिलन सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.कार्यक्रमाला माजी आमदार व आदिवासी महाराष्ट्र प्रदेश शिवसेना अध्यक्ष सहसराम कोरोटे, विधानसभा समन्वयक बळीराम कोटवार, तालुकाप्रमुख जयपाल प्रधान, महिला तालुकाप्रमुख सौ. आरतीताई जांगडे, सौ. सीमाताई सहसराम कोरोटे, महिला शहरप्रमुख सौ. सलमाताई पठाण, उपशहरप्रमुख सौ. रूपालीताई वाघाडे, जि.प.प्रमुख सौ. शिल्पाताई चाकाटे (गोटाबोडी), जिल्हा परिषद प्रमुख सौ. खेलनताई नागपूरे (पालांदूर), जि.प.प्रमुख सौ. किरणताई चौधरी (चिचगड), पंचायत समिती प्रमुख सौ. वंदनाताई गावड (चिचगड), तसेच शहर युवा सेना प्रतिनिधी आशिष कुमार शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार सहसराम कोरोटे यांनी आयोजित कार्यक्रमात शिवसेना ही पक्षाचे यशस्वी नेतृत्व व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सर्वांगीण विकास कार्याला साथ देत आहे.पक्ष हे

सामान्य माणसाच्या हक्काची आणि न्यायाची लढाई लढणारी संघटना आहे. आपल्या तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी महिला व युवकांची भरीव भूमिका आहे. आज मोठ्या संख्येने महिलांनी व नवयुवकांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. हा विश्वास राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे विचार माजी आ. सहसराम कोरोटे यांनी वेक्त केले.
यावेळी तालुका समन्वयक बळीराम कोटवार यांनी
देवरी–आमगाव तालुक्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत झाली आहे. महिला कार्यकर्त्यांचा सहभाग हा पक्षाच्या बळाचे लक्षण असून आगामी काळात विकासकामांचा वेग वाढवू,” असे बळीराम कोटवार यांनी सांगितले. महिला तालुकाप्रमुख आरती जांगडे यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महिला शक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेनेत महिलांना अग्रक्रम आहे. आज नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग पाहून आनंद झाला,” असे सौ. आरतीताई जांगडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला शहरप्रमुख सौ. सलमाताई पठाण यांनी तर आभार प्रदर्शन सौ. रूपालीताई वाघाडे यांनी केले. दिवाळी मिलनात परस्परांना शुभेच्छा देवून सर्वांनी ऐक्य व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.


