best news portal development company in india

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आश्वासन तर शिक्षण व शासन योजनेतील भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार नाही

SHARE:

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आश्वासन तर शिक्षण व शासन योजनेतील भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार नाही,कारवाई होईल पालकमंत्री नाईक यांची माध्यमांना माहिती.

आमगाव :- राज्यातील पूर्व विदर्भातील गोंदिया

जिल्ह्यात हवामान बदलाने झालेल्या अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले शासनातर्फे तात्काळ त्यांना मदतीचे आश्वासन ही देण्यात आले होते.सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पिकांचे नुकसान केले होते.शेतकरी तात्काळ मदतीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनातील अधिकारी तर पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांदयावर पोहचले नव्हते, याची ओरड जिल्ह्यात होती. तेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिनांक २ नोव्हेंबर ला जिल्ह्याचा दौरा करून शेकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निरीक्षण केले. आज जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड. इंद्रणिल नाईक,आमदार संजय पुराम, आ.राजकुमार बडोले, माजी आ. राजु जैन,जिल्हा परिषदचे उपाद्यक्ष सुरेश हर्षे,एसडीओ कविता गायकवाड यांनी यावेळी देवरी आमगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे निरीक्षण यावेळी केले.
प्रवास दौऱ्यात पालकमंत्री नाईक यांनी आमगाव तालुक्याचा दौरा करीत त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे निरीक्षण केले.यावेळी आमगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यालयात पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना साधक उत्तरे दिले.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून याद्वारे शासन मदत करेल असे त्यांनी सांगितले.
# राज्यातील शिक्षण विभागालील बनावट शालार्थ आयडी प्रकरणात पालकमंत्री यांचे नवीन कठोर भूमिका

राज्यात शिक्षण खात्यात झालेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यांत गोंदिया जिल्ह्यात कारवाई होणार काय? या प्रश्नावर त्यांनी मागील सहा आठ महिन्यापासून हा तपास सुरु आहे. अहवाल येऊ द्या नक्की करावाई होईल असे सांगितले. तर या प्रकरणात राजकीय दडपण आहे का, अनेक माजी आमदार पदाधिकारी गुंतले आहे अशी माहिती आहे.यांच्यावर कारवाई होईल काय?. या प्रश्नावर त्यांनी कुणालाही पाठीशी घालणार नाही, कुणीही असो कारवाई होईल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

# देवरी तालुक्यात मनरेगा योजनेत १ हजार कोटींचे बांधकाम घोटाळा?
प्रकरणात उद्या खुलासा करणार – पालकमंत्री यांची माहिती

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत मनरेगा योजनेसह विविध बांधकाम प्रक्रियेत जवळपास १ हजार कोटींचे भष्ट्राचार झाल्याची तक्रार सबळ पुरावेसह प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे, याबाबद कारवाई होईल? या प्रश्नावर त्यांनी आजच याबाबद माहिती घेऊन उद्या याबाबद खुलासा करायला लावू असे त्यांनी माध्यमाना सांगितले.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment