best news portal development company in india

आमगाव पोलीस स्टेशनतर्फे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

SHARE:

आमगाव पोलीस स्टेशनतर्फे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

आमगाव – आमगाव पोलीस स्टेशन येथे अलीकडेच तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शालेय परिसरात मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला.

५ मे २०१७ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शाळांमध्ये अल्पवयीन मुली व बालिका यांच्या सुरक्षेसाठी तक्रारपेटी (पिंक बॉक्स) बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही पेटी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सहज दिसेल अशा ठिकाणी बसवावी, तसेच प्रत्येक शनिवारी ती उघडून आलेल्या तक्रारींची पडताळणी करावी, असे ठरविण्यात आले. विद्यार्थिनींना छेडछाड किंवा इतर काही त्रास झाल्यास त्यांनी निर्भीडपणे यात तक्रार नोंदवावी. त्या तक्रारीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात यावी, असेही ठरले.

विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक दर दोन महिन्यांनी एकदा घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले. याशिवाय १३ मे २०१९ रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शाळांच्या आवारात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असल्याची माहिती मुख्याध्यापकांना देण्यात आली.

सावित्री समितीच्या नियमित बैठकांचे आयोजन करण्यासह शाळेत लहान मुलांना गुड टच – बॅड टच या संकल्पनेची माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. शाळा स्तरावरील महिला तक्रार निवारण समिती, तसेच अंतरात तक्रार समिती यांची बैठक शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत घेणे अनिवार्य आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

याचबरोबर चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ हा शाळेच्या दृश्यमान ठिकाणी लिहिण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीत एकूण १७० मुख्याध्यापक सहभागी झाले होते.

या वेळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कोणत्याही शाळेत अल्पवयीन मुलींबाबत तक्रार आल्यास मुख्याध्यापकांनी त्वरित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, तसेच अशा प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना देण्यात आली.

लहान मुली व बालिकांच्या सुरक्षेसाठी तक्रारींवर दुर्लक्ष न करता त्वरीत कार्यवाही करावी, असा ठाम निर्धार या बैठकीत घेण्यात आला.आमगाव तालुक्यातील ही बैठक शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.व सदर सूचनाचे पालन होईल असे मत यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी यांनी वेक्त केले.

 

आमगाव पोलीस स्टेशनतर्फे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी व उपस्थित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनातील वेक्ती
Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment