best news portal development company in india

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात ठाणा शाळेला प्रथम क्रमांक

SHARE:

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात ठाणा शाळेला प्रथम क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात ठाणा शाळेला प्रथम क्रमांक
पुरष्कार वितरण प्रसंगी मान्यवर व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक

 

आमगाव (ता.२ सप्टेंबर) : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आमगाव येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात Science and Technology for Mankind या विषयावर घेण्यात आलेल्या विज्ञान नाटिका स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, ठाणा (इ. ६ वी) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला.

विज्ञान शिक्षिका कु. स्नेहा रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेचे उत्कृष्ट सादरीकरण पाहून परीक्षकांनी ठाणा शाळेला पहिला क्रमांक घोषित केला. या यशामुळे शाळेला आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.गटशिक्षणाधिकारी श्री. वाघमारे, श्री. बोपचे, घोडेस्वार मॅडम, कटरे मॅडम, टेंभरे मॅडम, खापर्डे सर, गजभिये सर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन.एस. कोरे, सूरजलाल चौधरी, नंदकुमार जिभकाटे, सत्यवान कटरे, बापूसाहेब गुंड, गौरीशंकर पटले, गीता पांढरे, अनिता मानकर, पालक व शाळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment