best news portal development company in india

३० किलो चांदीचे चोरीचे बिंग फुटले मात्र पार्सल द्वारे डिलिव्हरी वर प्रश्नचिन्ह.

SHARE:

३० किलो चांदीचे चोरीचे बिंग फुटले मात्र पार्सल द्वारे डिलिव्हरी वर प्रश्नचिन्ह.

# कूरिअर बॉयच निघाला चांदी चोर; पोलिसांनी केली ३८ लाखांची चांदी जप्त

गोंदिया जिल्हा : शहरातील सराफा व्यापाऱ्याला गुजरात येथून मागविलेल्या ५० किलो चांदीपैकी ३० किलो चांदीचा पार्सल मिळाला नाही. व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, धक्कादायक उलगडा झाला. पार्सल चोरी कोणी दुसऱ्याने नव्हे तर कूरिअर कंपनीतीलच डिलिव्हरी बॉयने केली होती. तत्परतेने कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून तब्बल ३० किलो चांदी म्हणजेच सुमारे ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

# व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून उलगडा

शहरातील रामनगर येथे राहणारे सराफा व्यापारी रोहित रमेश सोनी (३६) यांनी आपल्या रोहित ज्वेलर्स (दुर्गा चौक) या दुकानासाठी ४ सप्टेंबर रोजी राजकोट (गुजरात) येथील प्रीतम बुलियन प्रा. लि. कडून मोबाईल अँपच्या माध्यमातून ५० किलो चांदीची खरेदी केली होती.
कुरिअर कंपनीमार्फत दोन पार्सल पाठविण्यात आले — पहिले २० किलोचे आणि दुसरे ३० किलोचे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता व्यापाऱ्याला २० किलोचा पार्सल मिळाला; मात्र ३० किलो चांदी असलेला पार्सल गायब असल्याचे लक्षात आले. या चांदीची बाजारातील किंमत तब्बल ३८ लाख रुपये इतकी होती. व्यापाऱ्याने याबाबत गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

# पोलिसांची तपास व कारवाई

ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डोंगरवार यांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत शंका येताच पोलिसांनी जिया अली कमर अली सैयद (३५, रा. बाजार चौक, रामनगर) या कूरिअर बॉयला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ३८ लाख रुपयांची ३० किलो चांदी जप्त केली. या घटनेनंतर शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

# ४८ तासांत सुटला गुन्हा

पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, १८ सप्टेंबर रोजी व्यापाऱ्याने हरविलेल्या ३० किलो चांदीची नोंद शहर पोलिस ठाण्यात केली होती. तपासाच्या धाग्यांचा माग काढून पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद केले. राजकोटहून नागपूरमार्गे गोंदियाला आलेला हा पार्सल कुरिअर कंपनीच्या जबाबदारीतून चोरीला गेला होता.

#

३० किलो चांदीचे चोरीचे बिंग फुटले मात्र पार्सल द्वारे डिलिव्हरी वर प्रश्नचिन्ह.
चोरी तपास करून चोरासह पकडलेल मुद्देमाल

व्यापाऱ्यांना इशारा – अतिरिक्त सुरक्षेची गरज

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक भामरे यांनी सराफा व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे की मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू कुरिअरमार्फत पाठविताना किंवा मागविताना अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना घडण्याची शक्यता कायम राहील.

# एक्साईज ड्युटी टाळण्याचा संशय

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणखी एक संशय व्यक्त केला आहे. सराफा व्यापारी कुरिअरमार्फत पार्सल मागवून कुठे एक्साईज ड्युटी टाळण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? यासाठी व्यापाऱ्यांचे बिल आणि व्यवहारांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळण्याची चिन्हे आहेत.
# ही घटना सराफा व्यापारी व कुरिअर कंपन्यांसाठी मोठी शिकवण आहे. विश्वासाच्या आधारावर चालणाऱ्या या व्यवहारात सुरक्षा व्यवस्थेची कडक गरज अधोरेखित झाली आहे.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment