दिवसाला १२ तास काम; मंत्रिमंडळाची मंजुरी, सुट्टी व ओव्हरटाईम नियमांतही बदल
मबई प्रतिनिधी:-राज्य शासनाच्या नियमन बदलाने कामगार यांचे तास व मिळणारे वेतन ही बदलणार आहे.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन क्षमता वाढवणे, वाढत्या ऑर्डर्स पूर्ण करणे आणि रोजगार संधी वाढवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कामगारांना अतिरिक्त तासांचे पूर्ण मोबदला मिळणार असून, सरकारची परवानगी व कामगारांची लेखी संमती घेणे बंधनकारक असेल.
बदललेले नियम:
कारखाने : दिवसाला १२ तासांपर्यंत काम करण्यास मंजुरी.
दुकाने व आस्थापना : दिवसातील कामकाज ९ वरून १० तास.
साप्ताहिक कामाचे तास : कमाल ४८ तासांची मर्यादा कायम, मात्र जादा काम केल्यास मोबदला व बदली रजा बंधनकारक.
ओव्हरटाईम मर्यादा : ११५ तासांवरून वाढवून १४४ तास.
विश्रांती कालावधी : ५ तासांनंतर ३० मिनिटे व ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांती अनिवार्य.
परवानगीशिवाय बदल शक्य नाही
कोणत्याही कारखान्याला शासन मान्यतेशिवाय आणि कामगारांच्या लेखी परवानगीशिवाय कामकाजाचे तास वाढवता येणार नाहीत. तसेच, ४८ तासांपेक्षा अधिक काम करून घेतल्यास त्या प्रमाणात बदली रजा देणे बंधनकारक असेल.
कामगारांच्या सुरक्षिततेचा व हक्कांचा विचार करूनच ही लवचिकता आणण्यात आल्याचे मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीस चालना मिळेल, रोजगार वाढतील आणि कामगारांनाही अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल, असा सरकारचा दावा आहे.


