best news portal development company in india

चीनच्या ‘विक्ट्री डे परेड’ला पुतिन-शहबाज शरीफ उपस्थित; मोदी मात्र गैरहजर!

SHARE:

चीनच्या ‘विक्ट्री डे परेड’ला पुतिन-शहबाज शरीफ उपस्थित; मोदी मात्र गैरहजर!

चीनच्या ‘विक्ट्री डे परेड’ला पुतिन-शहबाज शरीफ उपस्थित; मोदी मात्र गैरहजर!
चीनच्या ‘विक्ट्री डे परेड’ला पुतिन-शहबाज उपस्थित.

बीजिंग/नवी दिल्ली :
जपानच्या चीनमधील आत्मसमर्पणाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये भव्य ‘विक्ट्री डे परेड’चे आयोजन करण्यात आले. या परेडमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांसारख्या 20 हून अधिक देशांचे प्रमुख सहभागी झाले. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात सहभाग घेतला नाही, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शांघाय सहकार संघटना (SCO) शिखर परिषदेसाठी मोदी चीनच्या तियानजिन शहरात उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. तरीसुद्धा तीन सप्टेंबर रोजी झालेल्या विक्ट्री डे परेडला मोदी अनुपस्थित राहिल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

परेडमध्ये चीनने लष्करी ताकदीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच नवे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले. मात्र परेडमधील खरा केंद्रबिंदू होता – शी जिनपिंग, पुतिन आणि किम जोंग उन यांचा मंचावरील ‘त्रिकोणी’ जुगलबंदी. पुतिन चार दिवस चीन दौऱ्यावर होते, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परेडदरम्यान चीनवर रशिया-उत्तर कोरियासोबत संगनमताचा आरोप केला.

दरम्यान, 2020 मधील गलवान संघर्षानंतर भारत-चीन संबंधांमध्ये आलेली दरी आता हळूहळू कमी होत असल्याचेही दिसत आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर मोदींचा चीन दौरा विशेष ठरला. मात्र विक्ट्री डे परेडपासून त्यांनी घेतलेला अलिप्तपणा, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment