best news portal development company in india

जीएसटीमध्ये मोठा बदल; दिवाळीपासून ग्राहकांना दिलासा मिळणार

SHARE:

जीएसटीमध्ये मोठा बदल; दिवाळीपासून ग्राहकांना दिलासा मिळणार!

जीएसटीमध्ये मोठा बदल; दिवाळीपासून ग्राहकांना दिलासा मिळणार
GST परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री

 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (३ सप्टेंबर) रात्री जीएसटी संदर्भात मोठ्या घोषणा करत ग्राहक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

केंद्रीय वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची ५६ वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अर्थमंत्री सीतारामन यांनी जीएसटीमधील १२ टक्के आणि २८ टक्के कर स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता जीएसटीचे केवळ दोनच प्रमुख स्लॅब उरणार असून, सर्वाधिक जीएसटी दर १८ टक्के असेल.

# दिवाळीपूर्वी मोठी भेट

या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात “दिवाळीला देशातील नागरिकांना मोठी भेट मिळेल” असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

# कोणत्या वस्तूंवर स्वस्ताई?

अजून अंतिम यादी जाहीर न झालेली असली तरी, दैनंदिन वापरातील अनेक वस्तू, घरगुती इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कपडे, बूट, तसेच काही सेवांवरील कर दर कमी होण्याची शक्यता आहे. ग्राहक वस्तू आणि लघुउद्योग क्षेत्रालाही थेट फायदा मिळणार असल्याची चर्चा आहे.

# कोणत्या वस्तू महाग?

२८ टक्के कर स्लॅब हटवल्यानंतर उच्चभ्रू वस्तूंवरील कराचा बोजा थोडा कमी होईल. तथापि, तंबाखू, मद्य, लक्झरी कारसारख्या वस्तूंवर उपकर आकारणी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या वस्तूंवर दर घटण्याची शक्यता कमी आहे.

# राज्यांचा पाठिंबा

या प्रस्तावावर बिहारचे अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनीही आपला पाठिंबा दर्शवला. “केंद्राने ठेवलेल्या प्रस्तावावर आम्ही सहमती दिली आहे. आता अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेईल,” असे ते म्हणाले.

उद्योग क्षेत्र व नागरिकांची अपेक्षा

जीएसटी सुधारणा झाल्यास उद्योगांना कररचनेतील गुंतागुंत कमी होईल. ग्राहकांना दरकपातीचा थेट फायदा मिळेल. दिवाळीपूर्वी करकपातीमुळे विक्रीत वाढ होईल आणि बाजारपेठेला चालना मिळेल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे.
# एकूणातच, दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा करदिलासा मिळणार असून, जीएसटी कररचनेतले हे बदल “नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स” म्हणून ओळखले जातील.
केंद्र सरकार GST स्लॅब बदल हे दिवाळीभेट म्हणून घोषणा करणार असे अंदाज वर्तविण्यात आले आहे.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment