आमगाव पोलिसांची सिने स्टाईल कारवाई!
#अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या वाहनसह आरोपीला अटक

आमगाव (जि. गोंदिया) – २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आमगाव पोलिसांनी गुप्त माहितीनुसार नाकाबंदी करून दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीला जगनाडे चौक पर्यंत पाठलाग करीत वाहनासह पकडले.
राज्य सीमेवर अवैद्यपणे मद्य व गांजा अमली पदार्थ यांची मोठ्याप्रमानात वाहतूक माध्यमातून आरोपी हे पुरवठा करीत असल्याचे उघड चित्र आहे. याकडे लक्ष वेधून कारवाई करिता आमगाव पोलिसांनी राज्य सीमेवर कडक पहारा ठेऊन कारवाई ला सुरवात केली. दिनांक २१ आगस्ट ला सायंकाळी राज्य सीमेवरून दारूचे वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दबा धरून कारवाई केली. आरोपी हा अवैधरित्या दारूची वाहतूक करीत राज्य सीमेवरून पळ काढताना दिसताच पोलिसांनी त्या वाहणाला
अडविण्याचा प्रयत्न केले परंतु आरोपी वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी वाहणाचे पाठलाग करीत सिने स्टाईलने त्या वाहणाला संत जगनाडे चौक येथील अशोक टी पॉइंट समोर वाहणाला अडवून धरले.
पोलिसांनी अडविलेल्या वाहणातून इंग्लिश दारू ‘गोवा’ कंपनीचे एकूण 35 बॉक्स, ज्यांची किंमत सुमारे 2,23,440 रुपये इतकी आहे, तसेच महिंद्रा XUV 500 वाहन क्रमांक CG 07AS 8938 या वाहनाची किंमत सुमारे 15 लाख रुपये मिळून एकूण 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारवाईत हेड कॉन्स्टेबल असीम मन्यार , हेड कॉन्स्टेबल दुधराम मेश्राम , हेड कॉन्स्टेबल योगेश मुनेश्वर , पोलिस कॉन्स्टेबल चेतन शेंडे, पोलिस कॉन्स्टेबल भागवत कोळापे, पोलिस कॉन्स्टेबल नितीन चोपकर व पोलिस कॉन्स्टेबल विनोद उपराडे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमुळे दारूबंदी कायद्याचे उल्लंघन रोखण्यात आमगाव पोलिसांना मोठी कारवाई केली. आरोपी यांच्या विरुद्ध पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हा नोंद करण्यात आले.


