best news portal development company in india

बेपत्ता वीटभट्टी मालक विनोद देशमुख यांचे मृतदेह जंगलात सापडला!

SHARE:

विनोद देशमुख यांची हत्या तर नाही ?.

बेपत्ता वीटभट्टी मालक विनोद देशमुख यांचे मृतदेह जंगलात सापडला!
मृत विनोद देशमुख (संग्रहित छायाचित्र )

 

#पोलिसांचे शोध सुरु

# बेपत्ता वीटभट्टी मालक विनोद देशमुख यांचे मृतदेह जंगल परिसरात सापडला!

आमगाव (गोंदिया ) :- आमगाव तालुक्यातील घटेमणी गावातील मशिनेटोला (घाटटेमणी) येथे रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता वीटभट्टी मालक विनोद देशमुख यांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत वीटभट्टी मालक विनोद केसुलाल देशमुख (वय ४८) असे आहे, ते मशिनेटोला (घाटटेमणी) येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद देशमुख १९ ऑगस्टच्या रात्रीपासून बेपत्ता होते.त्यांचा शोध सुरू असताना २० ऑगस्ट रोजी दुपारी त्यांचे मृतदेह जंगल परिसरात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताची हत्या कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केली असल्याचा संशय आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळेल. रावणवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विनोद देशमुख हे समाजिक क्षेत्रात कार्यरत वेक्ती होते, त्यांनी गावातील अनेक समाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. तर स्थानिक शाळा व्यवस्थापण समितीचे ते अद्यक्ष होते. त्यांच्या या संस्यांस्पद मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे.त्यांच्या मृत्यूचे शोध पोलिसांनी लावून खरे कारण शोधावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment