बोगस शिक्षक भरती प्रकरणात ‘एसआयटी; ची मोठी कारवाई!
# गोंदिया जिल्ह्यातील तक्रार बाबद आरोपीच्या बचावासाठी माजी मंत्री व विधान परिषद सदस्य यांचे फोन?

प्रकरणात आमच्या माणसाला त्रास देऊ नका;
# शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार,सिद्धेश्वर काळुसे यांना अटक तर न्यायलयीन कोठडी.
# अनेक आरोपी संस्थाचालक यांची गृहमंत्री व लोकप्रतिनिधी तर मंत्रालयात धाव.
# भरती प्रक्रियेत १०० कोटींच्या अधिकची फसवणूक झाल्याचा आरोप.
नागपूर ब्युरो :- शिक्षक भरती प्रकरणातील शालार्थ आयडी घोटाळ्यात गठित एसआयटीच्या टीम ने २९ जुलै ला मोठी कारवाई केली. पोलिसांनी नागपूर येथे कार्यरत माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर कालुसे व यांना अटक केली .या अटक सत्राचे कारवाई पुढे येताच विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक गृहमंत्री व लोकप्रतिनिधी व मंत्रालयात स्वतःच्या बचावासाठी मुंबई गाठल्याची माहिती आहे.
त्यामुळे तपास कार्य प्रभावित होईल काय? अशी शंका पुढे आली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाचे संपूर्ण सखोल चौकशी व्हावी याकरिता एसआयटी स्थापन करून तपासाला गती दिली आहे. तर प्रकरणात कुणीही सुटता कामा नये अशी भूमिका ठेवली. यात संस्थाचालक मात्र मुंबई गाठुन काय साधणार यावर मात्र प्रश्न निर्माण झाले आहे. यातच तपास यंत्रनेने या प्रकरणात अटक केलेल्या दोघांच्याही चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले. त्यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिस सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ अर्ज दाखल करणार आहेत. राज्यस्तरीय एसआयटी गठित झाल्यानंतरची प्रकरण तपासाला गती आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
राज्यातील शिक्षण विभागात मंत्रालयातील बनावट आदेशाच्या माध्यमातून अनेक संस्थाचालकांनी शिक्षक पद मान्यता मिळवून घेतली तर उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडीचे आदेश जारी झाले नसताना शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट आयडी तयार केले. त्या माध्यमातून बोगस शिक्षकांना शासनाकडून वेतन देखील अदा करण्यात आले.
शालार्थ घोटाळ्यात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ सिद्धेश्वर काळुसे,
रोहिणी कुंभार,प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.प्रकरणात पूर्वी नागपूर पोलिस व पुढे राज्यपातळीवरील ‘एसआयटी’ करुन याचा तपास सुरू आहे. अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात रोहिणी कुंभार,सिद्धेश्वर कालुसे व यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले.
# ६३२ शिक्षकांची ‘वन टु वन’ सुनावणी लवकरच होणार असल्याचे संकेत चौकशी स्तरावरील समितीने दिले.
२९ जुलैला अटक करण्यात आलेल्या सिद्धेश्वर श्रीराम काळुसे हे १६ मार्च २०२४ पासून आजपर्यंत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर रोहिणी विठोबा कुंभार या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यरत होते.सदर कार्यरत अवधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी बनवून मान्यता दिल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांनाही बुधवारी अटक केली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ६ कोठडीची मागणी केली. मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पोलिसांकडून या आदेश विरोधात वरिष्ठ न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात येईल.अशी माहिती आहे.
# ३९८ बोगस शालार्थ आयडी तीन वर्षांत….!
रोहिणी कुंभार व सिद्धेश्वर काळुसे यांच्या हाती मार्च २०२२ पासून प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.कुंभार यांच्या जवळपास दोन वर्षांच्या कार्यकाळात २४४ बोगस शालार्थ आयडी जारी झाले. त्यानंतर काळुसेच्या कार्यकाळात १५४ बोगस शालार्थ आयडी देण्यात आले.तीन वर्षात ३९८ बनावट शालार्थ आयडी बनवून दिले.तर वेतन मंजुरी देऊन त्यांचे देयक वेतन अधिक्षक वेतन पथक यांना मान्यतेसाठी बहाल करण्यात आले. यामुळे शिक्षकांचे वेतनदेखील अदा करण्यात आले. तर वेतनापोटी आज पर्यंत शासनाच्या तिजोरीवर मोठा डल्ला मारण्यात आल्याचे समोर आहे. सदर दोन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही वेतन प्रक्रिया राबविली. त्या माध्यमातून त्यांनी तीनच वर्षात राज्य शासनाची शंभर कोर्टीहून अधिकची फसवणूक केली असल्याची बाब चौकशीतून समोर आल्याची ‘एसआयटी चे प्रमुख व झोन-२ चे उपायुक्त नित्यानंद झा यांनी माहिती दिली.
#प्रकरणात १४ आरोपीना अटक
बोगस शालार्थ आयडी घोटाळा व बोगस मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणात आतापर्यंत २० पेक्षा जास्त आरोपीना अटक झाली आहे.
त्यात तीन विभागीय शिक्षण उपसंचालक, तीन शिक्षणाधिकारी, दोन शाळा संचालक, दोन मुख्याध्यापक व चार चार लिपिक यांचा समावेश आहे.
आत या प्रकरणात अनेक आरोपीना एसआयटी गवसणार आहे.
# आरोपीची गृह मंत्री व मंत्रालयाची धाव! प्रशासन दखल घेईल काय?
मंत्रालयातील बनावट आदेश व शालार्थ आयडी तयार करून शिक्षक पद मान्यता घेणारे गोंदिया, भंडारा अश्या विदर्भातील संस्था चालकांनी वेतना पोटी निधी उचलून शासनाच्या तिजोरीची लूट केली आहे. आता तक्रार दाखल होताच आरोपीची गृह मंत्री व मंत्रालय येथे धाव घेऊन बचावासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.अश्या आरोपीना बळ तर मिळणार नाही असे प्रश्न आता अनेक तक्रार दाखल करणाऱ्यांना पडले आहे.
# आरोपीच्या बचावासाठी पूर्व तपास अधिकऱ्याला माजी मंत्री व विधान परिषद सदस्य यांचे फोन ?
“प्रकरणात आमच्या माणसाला त्रास देऊ नका;
मंत्रालयातील बनावट आदेश तयार करून विदर्भातील गोंदिया भंडारा अश्या जिल्ह्यात शिक्षक पद मान्यता व शालार्थ आयडी तयार करण्यात आले. तर याच बोगस शिक्षकांच्या वेतन अनुदानापोटी शासनाच्या निधीची लूट करण्यात आले. या प्रकरणात तक्रार दाखल होताच आरोपी संस्थाचालक यांनी लोकप्रतिनिधी व मंत्रालयातील अधिकारी यांच्या माध्यमातून बचावासाठी प्रयत्न केले असल्याची माहीती आहे. तर हे तपास कार्य पूर्वी ज्या अधिकारीकडे होते त्यांनी तक्रारदार यांना सांगितले “प्रकरणात आमच्या माणसाला त्रास देऊ नका; असे माजी मंत्री व विधान परिषद सदस्य यांनी बोलल्याचे सांगितले होते.त्यामुळे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप तपास कार्यावर उघड पडणार यात शंका नाही. त्यामुळे अनेक तक्रारदार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सदर प्रकरणात दबाव घालणाऱ्या काही लोकप्रतिनिधी किंवा इतरांचे फोन कॉलचे सीडीआर तपासून प्रकरणात दखल दिल्याची नोंद घ्यावी अशी मागणीच करण्यात आली आहे.


