अग्रहणी समाजाच्या संस्थापक महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीनिमित्त आमगाव येथे विशेष पूजा व सन्मान समारंभ
आमगाव : अहिंसा आणि समाजवादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे महाराजा श्री १०८ श्री अग्रसेनजी यांची जयंती यंदा २२ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साही आणि भक्तिभावाने आमगावच्या अग्रसेन भवनमध्ये साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता पूजा अर्चना व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात समाजातील इयत्ता ४ थी, १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर तसेच पोस्ट पदव्युत्तर शिक्षणात उज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मैडल प्रदान करण्यात येणार आहे. अग्रसेन स्मारक समिती, आमगाव तर्फे समाज बांधवांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये२२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ वाजता अग्रसेन भवन, आमगाव येथे कार्यक्रम महाराजा अग्रसेन यांच्या जीवनकार्याचा गौरव विद्यार्थ्यांचा गौरव व सत्कार समारंभसर्व समाज बांधवांना हार्दिक निमंत्रण कार्यक्रमात समाजात एकात्मता, एकजूट व ऐक्याचा संदेश दिला जाणार असून, महाराजा अग्रसेन यांच्या विचारांचा प्रसार व प्रबोधनही करण्यात येईल.
अग्रहणी समाजाचा गौरव: समाजबांधवांना एकत्र आणणारा महामेळावा आमगाव : अग्रसेन स्मारक समिती, आमगाव यांच्या वतीने महाराजा अग्रसेनजी यांच्या १९०८ व्या जयंतीनिमित्त विशेष पूजा व समाज बांधवांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील प्रगतीशील विद्यार्थ्यांना पदक, सन्मानपत्र देत गौरविण्यात येणार असून, सामूहिक प्रार्थनेद्वारे समाजात बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.या कार्यक्रमामुळे समाजातील युवा वर्गास नवा प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळणार असून, मेधावी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. अग्रसेन भवनमध्ये सोमवार २२ सप्टेंबर ला

संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर समाजबांधव एकत्र येणार असून, अग्रसेन स्मारक समितीने सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


