best news portal development company in india

गुणवंत विद्यार्थी घडवणे हे आपले कर्तव्य – दादाजी भुसे

SHARE:

गुणवंत विद्यार्थी घडवणे हे आपले कर्तव्य – दादाजी भुसे

गुणवंत विद्यार्थी घडवणे हे आपले कर्तव्य - दादाजी भुसे
मार्गदर्शन करताना मंत्री दादा भुसे

# शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास आढावा सभा

गोंदिया, (दि. ६ ): आज दिनांक ६ एप्रिल ला  जिल्हा परिषद गोंदिया च्या सभागृहात दादाजी भुसे शालेय शिक्षणमंत्री यांची शैक्षणिक गुणवत्ता विकास आढावा सभा जिल्हा परिषद सभागृह येथे घेण्यात आले.यावेळी लायकरामजी भेंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, प्रजित नायर, (भा. प्र. से ) जिल्हाधिकारी, गोंदिया, एम. मुरूगानांथम (भा. प्र. से ), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया, सुरेश हर्षे, उपाध्यक्ष जि. प. गोंदिया, मनोहर चंद्रिकापुरे (माजी आमदार), अर्जुन सिंह बैस जिल्हा प्रमुख युवासेना, मा. मायाताई शिवणकर महिला जिल्हा प्रमुख शिवसेना, माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर,तानाजी लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, राजकुमार हिवारे, प्राचार्य डायट, फॅनिंद्र कुतीरकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद गोंदिया, , जि. प. गोंदिया, दीपेंद्र लोखंडे सहाय्यक उपसंचालक, नागपूर विभाग, सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (माध्य.) विशाल डोंगरे, अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य सह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, निवडक आयडॉल शिक्षक उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक एम. मुरूगानंथम (भा. प्र. से ) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करून शिक्षण विभागाचे उपक्रमनिहाय सादरीकरण केले. जिल्ह्यातील गुणवत्ता बाबींचे सादरीकरण डायट प्राचार्य मा. राजकुमार हिवारे यांनी करून PAT, ASER, PARAKH, वर्षभऱ्यात राबविलेले प्रशिक्षणे व उपक्रम याबाबत सविस्तर जिल्ह्याचा आढावा सादर केला. तर माध्यमिक शिक्षण विभागाचा आढावा  विशाल डोंगरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी सादर केला. त्यानंतर  प्रजित नायर, जिल्हाधिकारी गोंदिया यांनी DPDC मधून जास्तीत जास्त निधी शिक्षण विभागाला देण्याचे प्रयत्न करीत आहे. प्रथम फॉउंडेशन च्या मदतीने जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणार असून पुढच्या वर्षी तसेच पुढच्या असर व परख सर्वेक्षणात जिल्ह्याची गुणवत्ता नक्कीच वाढली दिसेल असे मा. मंत्री महोदयांना आश्वस्त केले.

त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील निवडक आयडॉल शिक्षकांचे गुणवंत्तेवर आधारित शाळेचे सादरीकरण करण्यात आले ज्यामध्ये गोंदिया तालुक्यातून नरेंद्र गौतम, मुख्याध्यापक, (जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खर्रा), देवरी तालुक्यातून  नरेंद्र अमृतकर, मुख्याध्यापक, (जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा भागी), तिरोडा मधून लीलाधर बघेले, मुख्याध्यापक (जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा कोडेलोहारा), खोमेंद्र कटरे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा खोलगड, (ता. सालेकसा), बिसेन, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा हिरडामाली, (ता. गोरेगाव), सुरेंद्र भैसारे, जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा मोरगाव, (ता. अर्जुनी मोर) यांनी आपल्या शाळेचे सादरीकरण केले.
दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी उपस्थित सर्व अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
राज्यात जि. प. शाळांची पटसंख्या कमी होतांना गोंदिया जिल्ह्यातील पटसंख्या वाढत आहे त्यासाठी सर्व शिक्षकांचे व लोकप्रतिनिधी चे सहकार्य आहे यामुळे सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन. पण त्याच बरोबर असर, परख मध्ये जिल्हा मागे असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. जिल्हा यामध्ये मागे आहे करिता यासाठी ठोस असे कृती कार्यक्रम आखून मार्गक्रमण करावे लागेल. शाळांकरिता MREGS मार्फत कंपाउंड वॉल मागणे, CSR फंड वाढविणे, पालक मंत्री महोदयांना शाळेचा आराखडा तयार करून देणे,
गोंदिया ला राज्य पातळीवार जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.शाळांमध्ये सुधारणा आवश्यक आहे त्यासाठी सर्व स्थानिक पदाधिकारी यांना शाळांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो. भागी शाळेला शाळा इमारतीकरिता जिल्हास्तरावरून प्रयत्न करावे. जमीन मिळविण्याकरिता ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव सादर करून पाठवावा. इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा टप्पा सुरु होणार आहे त्यामध्ये कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. काही अडचणी आल्यास आयुक्त कार्यालयास संपर्क करून समस्या सोडविण्याचे प्रयत्न करावे.जो पर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला किंवा उपक्रमाला लोकप्रतिनिधीचे सहकार्य व समाजसहभाग झाल्याशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. करिता शिक्षकांनी समाजाशी संवाद साधने आवश्यक आहे तरच शाळेची प्रगती होऊ शकते हे शिक्षकांनी केलेल्या सादरीकरणावरुन दिसून येते. सर्वांनी देखील तसें प्रयत्न करावे व आपल्या शाळेची प्रगती साधावी.
जि. प.भागी शाळा व ज्या ज्या शाळांच्या शालेय परिसर व जमिनीबाबत काही अडचणी असल्यास सर्वांनी योग्य ते प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत सादर करून १ हेक्टर पर्यंत जमीन जिल्हा पातळीवरच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात. वन विभाग देखील त्यासाठी मदत करू शकते फक्त त्याबाबत योग्य दिशेने प्रस्ताव सादर करावे लागेल. आणि तरी जर काही अडचणी आल्याच तर आपण शासन स्तरावर त्या नक्कीच सोडविण्यासाठी प्रयत्न करूया. मा. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आपल्या शिक्षण विभागाला झुकते मापं असून सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.कोडेलोहारा येथील शाळेनी मुलांच्या स्वच्छता बाबतीत केलेले कार्य अभिनंदनीय आहे. जे आयडॉल शिक्षक आहेत त्यांच्यामागे शासन नेहमी आहे. हिरडामाली शाळेने लावलेले माजी विद्यार्थी फलक छान उपक्रम आहे. सर्वांनी तसे केले तर समाज सहभाग मिळविणे अशक्य नाही. आणि शाळा विकासासाठी ते महत्वाचे पाऊल ठरेल. त्याकरिता उपस्थित सर्वांना आवाहन आहे की गुणवत्तापूर्ण, आनंददायी शिक्षण देणेसाठी गुरुजी, शिक्षक आनंदी असणे गरजेचे आहेत. त्यामुळे शिक्षकांचे छोटे छोटे कार्य असतील ते सर्व तालुका व जिल्हा पातळीवरचे कार्य नियमानुसार निकाली काढावे. शिक्षकांना जिल्हा परिषद व तालुक्याला नेहमी नेहमी यावे लागणार नाही याची सर्व अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी.
राज्यातील ४८ शिक्षक सिंगापूरला जाऊन तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आलेले आहेत. आपल्याही जिल्ह्यातील दोन शिक्षक सहभागी झाले होते त्यांची कार्यशाळा आल्यानंतर शिर्डीला घेतली व त्यांच्याकडून ४ तास सिंगापूर मधील शिक्षण पद्धतीबाबत माहिती जाणून घेतली. त्यामधील सरांश असा की, सिंगापूर ची शिक्षण पद्धती ही Nation first यावर भर देते. त्याचप्रमाणे आपण देखील राष्ट्र प्रथम हाच मुद्दा आपल्या अभ्यासक्रमात घेत आहोत.
सिंगापूर चे शिक्षक हे आपल्या पेशाला एक पॅशन म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे आपले शिक्षक ही कार्य करतात. विद्यार्थी हे दैवत आहेत हे जाणून आपले शिक्षक काम करतात. विद्यार्थी आपल्या देशाचा भावी नागरिक घडवण्यासाठी काम करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन करतो असे उदगार यावेळी मंत्री भुसे केले. तसेच सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये परिपाठात राष्ट्रगीता नंतर आपले राज्यगीत गाणे बंधनकारक आहे. मराठी भाषा हा आपला मानबिंदू आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. सर्वांनी याची खतरजमा करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी यांनीही आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेटी देऊन याची पडताळणी करावी. जर सांगून देखील शाळांनी दुरुस्ती केली नाही तर त्यांच्यावर कार्यवाही देखील करावी. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन यावर्षी आपल्याला देशभक्तीपर कवायत दिन म्हणून साजरा करायचा आहे. याबाबत विविध व्हिडीओ पाहणे. राष्ट्रप्रेम जागृत करून १५ ऑगस्ट ला सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये ध्वजारोहणाचे नियम पाळून गावातील सर्व लोकांसमोर ही कवायात सादर करण्यात यावी.
जिल्ह्यासाठी शिक्षण विभागातील उपक्रमांसाठी जास्तीत जास्त निधी राज्यावरून मिळवून देण्यात येईल. गणवेश निधी दिला गेला आहे. काही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे गणवेश दिले गेले आहेत अशी बाब दिसून येते ही बाब उचित नाही. चांगला व गुणवत्ता पूर्ण गणवेश देणे आवश्यक आहे.याचीही सर्वांनी खबरदारी घेण्यात यावी. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विद्यार्थीच्या पालकांसमोर करण्यात यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना काही आजार असेल त्याची माहिती पालकांना तात्काळ होईल. राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा या पूर्वीप्रमाणेच ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे कारण ज्या शाळा फक्त ४ थी व ७ वी पर्यंत आहेत त्यांची ही अडचण दूर होईल. तसेच मेरिटमध्ये आल्यावर सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. असे ही मा. मंत्री महोदयांनी सांगितले. ज्या शाळांनी व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांचे अभिनंदन. तसेच सर्व शाळांच्या आवारा मधील किंवा शाळेच्या जवळपास तंबाखू जन्य पदार्थ विकले जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. त्यांना समजावून सांगावे अन्यथा त्यांची पोलीस तक्रार करावी. रिक्त पदांच्या संदर्भात आता पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती सुरु होणार आहे. सर्व विभागातील प्रशासनाचे अधिकारी, पदाधिकारी यांचा झुकता माप आपल्या विभागाला आहे. आयडॉल शिक्षकांचा लाभ आता केंद्रातील शाळा, तालुक्यातील शाळा चांगल्या करण्याकरिता घेण्यात यावा. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील. सर्व चांगले उपक्रम एकमेकांना share करू व सर्व शाळा चांगल्या करूया. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सर्व गाव उपस्थित असेल असे आवाहन करतो. १५ ऑगस्ट ला राष्ट्रगीत, राज्यगीत, कवायत व पसायदान असा क्रम ठेवून कार्यक्रम घेणे आहे. असेहीशिक्षण मंत्री भुसे यांनी सुचवले. सभेचे सूत्रसंचालन दिनेशकुमार अंबादे, शिक्षक यांनी केले तर आभार महामुनी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी मानले.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment