best news portal development company in india

तरुणाकडून ८० हजार रुपये लंपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही केव्हा?

SHARE:

तरुणाकडून ८० हजार रुपये लंपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही केव्हा?

तरुणाकडून ८० हजार रुपये लंपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही केव्हा?
पोलिसांनी लुटलेली घटना सांगताना युवक

# घटनेची वाचा फुटणार काय?

# न्यायाच्या प्रतीक्षेत तरुण.
——————————-

गोंदिया(आमगाव):-नंगपुरा कालीमाती येथील रहिवासी प्रवीण मोडघरे यांचे सातबारा या नावाचे जेवणावळीचे ढाबे आहे. या ढाब्यावर अवैद्य दारूची विक्री करीत असल्याचा ठपका ठेवून पोलीस विभागातील दोन शिपाई आठ डिसेंबर २०२४ला ढाब्यावर गेले व प्रवीणच्या मोटार सायकल च्या डिक्कीची तपासणी केली. त्यांना अवैद्य दारू तर मिळाली नाही मात्र त्यात ठेवलेले अंशी हजार रुपये त्यांनी गहाळ केले. पुढे या प्रकरणाचे बिंग फुटू नये म्हणून वाटेत माझ्या मोटार सायकलच्या डिक्कीत अवैद्य देशी दारू ठेवून खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप प्रवीण मोडघरे यांनी केला व सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही व माझे पैसे मला परत मिळत नाही तोपर्यंत मी सतत न्यायाची मागणी करत राहणार अशी गुहार हनुमान मंदिर सभागृहात २० जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
सदर प्रकरणाची तक्रार प्रवीण यांनी पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्याकडे त्यावेळी सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु पोलीस विभागांनी चौकशी दरम्यान अमोरासमोर चौकशी न करता सदर पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही. करिता आपणास न्याय मिळावा म्हणून पत्र परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
या प्रकरण विषयी व्यथा मांडताना प्रवीण मोटघरे यांनी सांगितले की आठ डिसेंबरला सायंकाळी दोन पोलीस कर्मचारी आले व तुझ्या गाडीची तपासणी करायची आहे चावी दे असे म्हणून जबरदस्तीने चाबी व मोबाईल हीसकावून घेतले.त्यावेळी गाडीच्या डिक्कीत ८० हजार रुपये होते. सदर रक्कम मी दोन दिवसापूर्वी धान विक्री करून आणली होती व ती रक्कम गोंदिया येथील मावशीला देण्यासाठी जाण्याच्या तयारीत होतो. एवढ्यात हे प्रकरण घडले. एका पोलीस कर्मचाऱ्यांने माझी दुचाकी क्रमांक एम एच ३५ एयू ४२३४ ची डीक्की उघडून तपासणी करू लागले. तेवढ्यात दुसरा पोलीस वाल्यांनी माझे लक्ष दुसरीकडे वळवून डीक्कीतील ८०हजार रुपये काढले असा माझा ठाम विश्वास आहे. नंतर मला गाडीवर बस असे म्हणून माझ्या स्वतःच्या गाडीवर बसून पोलीस स्टेशन कडे येताना रस्त्यात एका ठिकाणी गाडी थांबवून आधीच रस्त्याच्या कडेला ठेवलेली एक पिशवी गाडीच्या डिकीत टाकली. पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर माझ्या हातात चाबी दिली व डिक्की उघडण्यास सांगितले.पिशवी काढताना त्याचा फोटो घेतला. तू अवैद्य दारूची विक्री करतोस असे धमकावून तुझ्यावर गुन्हा दाखल करू असे म्हणाले.त्यावेळी माझ्या गाडीच्या डिक्की मध्ये रुपये नव्हते. मी ८० हजार रुपयांची विचारणा केली असता आम्हाला काय माहित तुमचे पैसे कुठे गेले तुझ्याकडून दारू मिळाली आणि तुझ्यावर दारूच्या गुन्हा दाखल करतो असे म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला व मला खोट्या प्रकरणात अडविले आहे. सदर प्रकरणाची मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून सखोल चौकशी करण्यात येईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी चौकशी केली परंतु सदर चौकशीला मला न बोलाव आज सहा महिने लोटूनही माझी रक्कम परत मिळाली नाही व त्या कर्मचाऱ्यावर कारवाई सुद्धा झालेली नाही करिता आज पत्र परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून मी आपली व्यथा मांडत आहे असे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी असाच लढा देणार. न्याय मिळाले नाही तर न्यायालयाच्या दार थोठावणार आहे असे पत्र परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे.
# सत्याला वाचा फुटणार काय?

    सदर घटने बाबाद पोलीस कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की पोलीस विभागामार्फत चौकशी झाली असून त्यांना माझ्यावर केलेला आरोपाचा कुठलाही ठोस पुरावा मिळाला नसून सदर तरुण माझ्यावर खोटा आरोप करीत आहे.असे पोलिसांनी सांगितले.यामुळे युवका सोबत झालेली घटनेची वाचा फुटणार काय असा प्रश्न उपस्थित झाले आहे.

Yashwant News
Author: Yashwant News

Leave a Comment